आठवणींची सजावट

लाकडाचा आणि माणसाचा संबंध पाळण्यापासूनचा. पाळण्याच्या लाकडी कड्या बाळमुठीत धरुन पाळण्याबाहरेचं जग न्याहाळण्यासाठी किती धसमुसळेपणा करायचो, हे सांगताना आईचे डोळे आजही उत्साहाने लकाकतात. पांगुळगाड्यामागे दुडूदुडू धावत बाल्य मागं पडलं. शाळेत पहिला ‘श्रीगणेशा’ गिरवला त्या दगडी पाटीची चौकट लाकडीच होती. पाटी कितीदा फुटली पण ‘चौकट’ टिकून राहिली. विटी-दांडूचा जमाना सरताना क्रिकेटची बॅट हाती आली. पण बॅटसुद्धा ‘काश्मिरी विलो’चीच की. अंगणात चौकार-षटकारांची बरसात सुरु व्हायची तोच आजोबांच्या हातातल्या नक्षीदार लाकडी काठीचा धाक जाणवायचा. पाठोपाठ करड्या आवाजातलं फर्मान सुटायचं, ‘बसून खेळा काय ते.’ मग मदतीला यायचा तो गोल, गरगरीत भोवरा…लाकडाचा.

काळोखी तिन्हीसांज आईची हाक घेऊन यायची. हात-पाय धुतल्यावर काळया-कुळकळीत पहाडी रंगाच्या शिसवी देवघरापुढं शुभंकरोती व्हायची आणि दिवाणखान्यातल्या झोपाळ्यावर पाढ्यांची उजळणी. सागवानी पाटावर पंगत रंगायची. तोवर परसदारातल्या वेळूवर चढलेल्या मधुमालतीचा गुलाबी गंध पश्चिमेच्या झुळुकेसरशी घर भारुन टाकायचा. डोळे पेंगायचे. पलंगावर माळ ओढत बसलेल्या आजीच्या गोधडीत शिरुन गोष्ट ऐकण्याचा हट्ट तेव्हाच व्हायचा. आजीची गोष्ट नेहमी अर्धीच ऐकली. स्मरणात राहिला तो कपाळावरचा तिचा मायेचा हात आणि तो ऐसपैस खानदानी शिसवी पलंग.

वयासंगं गावाकडचा चौसोपी वाडा दुरावला. शिक्षण-करियरसाठी वेस ओलांडली. युरोप-अमेरिकेत जाऊन आलो. राजस्थानचे शाही महाल आणि उत्तरेचे राजवाडे पाहिले. दक्षिणेकडच्या मंदिरांची सुबकता न्याहाळली. Mind is modernized but the mindset has not changed. जग पालथं घातलं तरी मन मराठीच राहिलं. बापजाद्यांच्या चिरेबंदी वाड्याचं छत पिढ्यानपिढ्या तोलून धरणाऱ्या तुळया, नक्षीदार खांब, मजबूत खांडं-दांडं लक्षात राहिली. कॉलेजसाठी पहिल्यांदा घराबाहेर पडलो तेव्हा भक्कम दरवाजाआडून निरोप देणारी पाणावलेल्या डोळ्यांची आई आजही आठवते.

माणसांच्या आठवणी अवतीभोवतीच्या चीजवस्तुंसकट नोंदल्या जातात ना मनात. त्या सगळ्या आठवणींचा काशिदा माझ्या नव्या घरातही मला पुन्हा विणायचाय. सहजच आठवलं हे सगळं. म्हटलं जुन्या प्रिय आठवणींनासुद्धा नव्या घरात जागा द्यायची. घर सजवायचंय जुन्या आठवणींचा नव्या गरजांशी मेळ घालत घर सजवायचयं. पारंपरिक तरीही अगदी मॉडर्न. माझ्या पुढच्या पिढ्यांनीही म्हटलं पाहिजे, “या सुंदर चीजा माझ्या बापजाद्यांच्या काळातल्या बरं का ?”

जगात फक्त, ‘तुमच्या’च घरात

घराचं स्वप्न कोणाला पडत नाही? प्रशस्त फ्लॅट, बैठा बंगला किंवा अनेक मजली इमारत, एखादं निसर्गरम्य झकास असं फार्म हाऊस…वेगवेगळ्या स्वरुपातलं घर प्रत्येकाच्या मनात असतं. नुसतं घरच कशाला?ऑफिस, हॉटेल्स, मंगल कार्यालयं, रिसॉर्टस् अशा वेगवेगळी कामाची व्यावसायीक ठिकाणसुद्धा. तुमचं घर असो की कामाचे ठिकाण त्याचं रंग, रुप ठरतं ते आतल्या वस्तुंनी. पुर्वी लोकं म्हणायचे की ‘अंगण घराचा आरसा असतं.’ खरंय. घराचा दरवाजा, खिडक्या, दिवाणखान्यातला सोफा, खुर्च्या, टेबल, आरसे, मुर्त्या, भिंतींवरची पेंटिंग्ज, घड्याळ, शिल्पं एका ना अनेक शंभर वस्तु. या सगळ्या ‘वस्तुं’नी मिळून तर तुमच्या ‘वास्तुं’च कॅरेक्टर निश्चित होतं. यजमानाच्या आवडीनिवडीतून वास्तुची संस्कृती उमटते.

हौसेला मोल नसतंच. पण म्हणून घराचं म्युझीयमही बनवत नसतं कोणी. घरातल्या प्रत्येकाच्या गरज भागवणाऱ्या नेमक्या वस्तु जिथल्या तिथं. सुंदर आणि आटोपशीर. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडची वस्तु फक्त आपल्याच घरात असायला हवी. फर्निचरच्या कुठल्याही दुकानात सहज मिळणारी, इतर चारचौघांकडे असणारीच डिझाईन्स आपल्याकडे नकोतच. ग्राहकांच्या या अपेक्षेला आम्ही सर्वोच्च प्राधान्य दिलयं.

म्हणूनच, कदाचित तुम्हाला नवल वाटेल. ‘एकबोटे व्हेंचर्स’मध्ये याल तेव्हा तुम्हाला प्रॉडक्ट कॅटलॉग पाहायला मिळणारच नाही. आमच्या दुकानात सेल्समन तर आजिबात नाहीत कारण आम्हाला फक्त फर्निचर विकण्यात रस नाही. प्रत्येक ग्राहक आहे आमच्यासाठी खास. आमची उत्पादनं आणि आमच्या संकल्पना ग्राहकाच्या घरात आम्हाला कोंबायच्या नाहीत. तुमच्या स्वप्नातल्या घरात आमच्या आवडी-निवडीचं आक्रमण का बुवा?

indian classic baithak 2 तुम्ही आजच ‘एकबोटे व्हेंचर्स’मध्ये या आणि फरक अनुभवा. तुमच्या स्वागताला असतील प्रशिक्षित कन्सल्टंटस्. समोर दिसतील ते उत्कृष्ट कारागिरीचे अफलातून नमुने. तुम्हाला वास्तुत काय हवंय हे तुम्ही सांगायचं. आमचे कन्सल्टंट कॉन्सेप्ट समजावून सांगतील. तुमची गरज, आवड, बजेट, घराचा आकार आदी तपशील लक्षात घेऊन मार्गदर्शन करतील. काय चांगल दिसेल ते सुचवतील. तुम्हाला हवे असलेले बदल नोंदवून घेतील. प्रत्येक प्रॉडक्टचं डिटेलिंग व्हायला हवं. कारण, तुमच्या घरात येणारी वस्तु फक्त तुमच्याकडेच असली पाहिजे. तुमच्या वास्तुत येणारी वस्तु तुम्हाला इतरत्र कुठेच दिसली नाही पाहिजे. तुमच्या वास्तुची आयडेंटीटी अनोखी ठरावी, हाच तर आमचा प्रयत्न आहे. आवड, निवड तुमची; फर्निचरचं डिझाईनिंग, कल्पना आमची. तुमच्या स्वप्नातलं, तुमच्या गरजा पूर्ण करणारं हवं तसं फर्निचर तयार करुन देण्याची जबाबदारी आमची.

‘स्टुडिओ’त बनतं तुमचं फर्निचर

दत्तोबा गोविंद आणि दामोदर गोविंद या एकबोटे बंधुंनी पन्नासच्या दशकात पुण्यात कारागिरी सुरु केली. छत्रपतींनी सोन्याचा नांगर फिरवलेलं पुणं आणि दिल्लीचं तख्त फोडणाऱ्या बाजीरावाचं पुणं ऐतिहासीक वास्तुंनी भरलेलं. पुण्यातली वाडासंस्कृती लोप पावली. फ्लॅटसंस्कृतीने तिची जागा घेतली. पण एकबोटेचं फर्निचर दोन्ही संस्कृतींमध्ये अलगद मिसळून गेलं. आमच्या वाडवडिलांनी फक्त सुतारकामच केलं नाही. त्याला आधुनिकतेची जोड दिली. एकबोटेचं फर्निचर दिसायला जितकं आकर्षक टिकायला तितकचं दमदार आणि भक्कम. चोखंदळ पुणेकरांचा विश्वास सातपेक्षा अधिक दशके जपलाय एकबोटेंनी.

हे सगळं जवळून पाहात, शिकत आम्हीही मोठे झालो. परंपरेने आलेले सुतारकाम माझ्याही बोटातून उतरु लागलं. पिढीजात धंदा होताच. जोडीला जीडी आर्ट कमर्शिअल इंटिरिअरचं शिक्षणही घेतलं. मॉडर्न युगाच्या फर्निचरबद्दलच्या अपेक्षा आणि गरजा कमालीच्या बदलत चालल्या आहेत. मास प्रॉडक्शनपुरताच मर्यादीत राहिलो तर ‘एकबोटें’चं वेगळेपण संपून जाईल, हे लक्षात आलं. चित्रकाराचा स्टुडिओ असतो. फोटोग्राफरचा स्टुडिओ असतो. ‘काष्ठशिल्प’ हीसुद्धा भारतीय संस्कृतीतल्या 64 कला-विद्यांमध्ये आहे. तेच लाकूड, फळ्या, फर्निचर या सगळ्यांकडं आधुनिक नजरेनं पाहणारा स्टुडिओ उभारण्याचा विचार केला आणि सुरुही केला. लाकडातील कारागिरीला मिळालेला प्रतिसाद उत्साह वाढवणारा आहे. ‘एकबोटे व्हेंचर्स’च्या स्टुडिओत आपल्याला हवे तसे फर्निचर करुन मिळते हे माहित झाल्यावर ‘वुड स्टुडिओ’कडे येणाऱ्यांचा ओघ वाढतोय.

जुन्यापुराण्या हवेल्या, महाल, राजवाडे यातून दिसणारी लाकडावरची कारागिरी लोप पावते आहे. लाकुडकाम करणारे कारागीर नव्याने तयार होत नाहीत. केवळ पैसा हे कारण त्यामागे नाही. सुताराकडं पाहण्याची लोकांची नजर आदरयुक्त नाही. सुतारकामाला कला समजलं जात नाही. सुतार, लोहार, पाथरवट आदी कलाकारांच्या कौशल्याला पुरेसं मोल मिळत नाही तिथं आदर कुठून मिळणार? हे चित्र बदलवण्याचा प्रयत्न पुण्याच्या स्टुडिओत मी करतोय. भारतभर फिरुन, जगाच्या पाठीवरुन लाकडावरील कारागिरी, विविध शैली न्याहाळतो. जुन्या कारागिरीला आधुनिक साज देवून आजच्या काळातल्या वास्तुंचं वैभव वाढवण्याचा माझा प्रयत्न आहे. ग्राहकांच्या गरजेनुसार फर्निचरचं डिझाईनिंग स्वतः करतो. कारागिरांना घडवतो. आजच्या कॉम्प्युटरयुगातसुद्धा नवीन कारागिरांची फौज आमच्या स्टुडिओत आहे. फक्त तुमच्याच घरात असतील असे हॅंडमेड डिझाईन्ड प्रॉडक्टस् तयार करण्यासाठी.

‘फर्निचरचा स्टुडिओ’ एवढी एकच संकल्पना नवी नाहीये. इथल्या कारागिरीची शैली पारंपरिक असली तरी फर्निचरची डिझाईन्स मात्र अगदी नवी, तुमच्या अत्याधुनिक वास्तुंच्या गरजा पूर्ण करणारी. घराला आर्टिस्टीक मूड देणारी. तुमचा स्वतःचा ‘युनिकनेस’ जपणारी. जरुर या एकदा. तुमच्या ‘वास्तु’शी बोलायला मी उत्सुक आहे.

– सुहास एकबोटे

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *